Join WhatsApp group

Ads

दुकानात सामान आणण्यासाठी गेलेले मंगेश मृतावस्थेत आढळले

By Sarkar Maza

June 14, 2026 10:53 am

Ads

मुर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील मारवाडी पुरा येथे राहणारे मंगेश दिगांबर चारथळ (वय 45 वर्षे) हे दि. 11 जून 2026 रोजी रात्री घरातून दुकानात सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला.

दरम्यान, दि. 13 जून रोजी सकाळी एजाज भाई यांच्या शेतातील विहिरीमध्ये मंगेश चारथळ यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच माना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

प्राथमिक पाहणीत मृताने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी पोलीस स्टेशन माना येथे मर्ग क्र. 16/26 कलम 194 BNSS अन्वये नोंद करण्यात आली असून, ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल देवीकर व पोलीस कॉन्स्टेबल राणे पुढील तपास करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!