Join WhatsApp group

Ads

ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना पोलिसांची धडक कारवाई; ५६ हजारांचा सडवा मोहमाच जप्त

By Sarkar Maza

June 6, 2026 9:57 am

Ads

अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी अवैध दारू निर्मितीविरोधात मोठी कारवाई करत ५६ हजार रुपये किमतीचा सडवा मोहमाच जप्त केला आहे.गोपनीय माहितीच्या आधारे दि. ३ जून २०२६ रोजी पोलीस स्टेशन माना येथील पथकाने ग्राम मधापुरी शेतशिवारात छापा टाकला.

यावेळी अमोल सुभाष सोळंके (वय ३५, रा. मधापुरी, ता. मुर्तिजापूर, जि. अकोला) हा गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या सडवा मोहमाचासह आढळून आला.कारवाईदरम्यान पोलिसांनी एका लोखंडी ड्रममधील १०० लिटर तसेच १२ टपरी डब्ब्यांमधील १८० लिटर, असा एकूण २८० लिटर सडवा मोहमाच जप्त केला. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹५६,००० इतकी आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मुर्तिजापूर) वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पोलीस हवालदार दीपक सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद हिवराळे व चालक पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर हिरळकर यांनी सहभाग घेतला.

अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!