Join WhatsApp group

Ads

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

By Sarkar Maza

June 1, 2026 7:20 pm

Ads

बोरगाव मंजू (प्रतिनिधी) – स्वच्छता, सदाचार आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मारक परिसरातच कथितपणे वरली-मटका आणि इतर अवैध धंदे फोफावत असल्याच्या चर्चेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगू लागली आहे.

“बोरगाव मंजूचा रतन खत्री नेमका कोण?”

स्थानिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, काही व्यक्ती खुलेआमपणे मटका आणि सट्ट्याचे व्यवहार चालवत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे “खेळकर आणि खंदेल बोरगाव मंजूचे रतन खत्री कोणाच्या आशीर्वादाने इतके निर्धास्त?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, महापुरुषांच्या स्मारकाजवळ अशा प्रकारच्या चर्चांना उधाण येणे हीच प्रशासनासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. परिसरात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी आणि चर्चा होत असताना पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई का दिसून येत नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

“जर सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे, तर संबंधित यंत्रणांना माहिती नाही का?” हा प्रश्न आता वारंवार विचारला जात आहे. त्यामुळे बोरगाव मंजूतील कथित अवैध धंद्यांच्या मागील सूत्रधारांचा शोध घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या विचारांचा सन्मान राखायचा असेल तर स्मारक परिसरातील अशा कथित प्रकारांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!