Join WhatsApp group

Ads

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

By Sarkar Maza

May 31, 2026 9:03 pm

Ads

अकोला, ३१ मे: जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेला तब्बल ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार माना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन हद्दीतील कुरूम शेतशिवारात सरकारी विहिरीजवळील नाल्यालगत एक व्यक्ती गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सडवा मोह साठवून ठेवत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी मोहन यशवंत सरदार (वय ६०, रा. कुरूम, ता. मूर्तिजापूर) याच्या ताब्यातून एक लोखंडी ड्रम आणि ११ टपरी डब्यांमध्ये भरलेला एकूण ३४० लिटर सडवा मोह आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या सडवा मोहाची किंमत सुमारे ६८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला सडवा मोह घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश हरमकार, पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल ललित बनचरे यांनी पार पाडली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!