Join WhatsApp group

Ads

-

“पोलिस दलात आनंदाचे वातावरण; पारदर्शक बदली प्रक्रियेचे होत आहे स्वागत”पोलीस कर्मचारी वर्गाकडून एसपींना सलाम”

By Sarkar Maza

May 27, 2026 2:02 pm

Ads

अकोला जिल्हा पोलिस विभागात सुरू असलेल्या जिल्हा बदली प्रक्रियेमुळे कर्मचारी वर्गामध्ये समाधान आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात प्रथमच बदली प्रक्रियेत पारदर्शकता, कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याची भूमिका आणि संवेदनशील प्रशासनाची झलक पाहायला मिळत असल्याची भावना कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.

पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी संपूर्ण प्रक्रियेत कर्मचारी वर्गाच्या भावना, कौटुंबिक अडचणी, आरोग्य विषयक समस्या तसेच सेवेशी संबंधित बाबी समजून घेत संबंधित कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या पसंतीच्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.यामुळे अनेक पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी “मनापासून धन्यवाद साहेब” अशा भावना व्यक्त करत पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे.

कर्मचारी वर्गातून तर “न भूतो न भविष्यती असे पोलिस अधीक्षक अकोला पोलिस खात्याला पुन्हा मिळणे कठीण आहे,” अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे.

सकारात्मक नेतृत्वाची ओळख

पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कार्यकाळात अकोला पोलिस दलाने अनेक उल्लेखनीय कामगिरी केली असून, विविध स्तरांवर पोलिस विभागाला अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत.

कायदा व सुव्यवस्था, गुन्हे उघडकीस आणणे, जनसंपर्क, संवेदनशील प्रशासन आणि कर्मचारी हिताचे निर्णय या सर्व बाबींमध्ये त्यांच्या नेतृत्वाची सकारात्मक छाप दिसून आली आहे.विशेष म्हणजे, कर्मचारी वर्गामध्ये प्रसन्नतेचे वातावरण ठेवत प्रशासन चालविण्याची त्यांची कार्यशैली अकोला पोलिस विभागासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!