Join WhatsApp group

Ads

अकोला पोलिसांचा अभिनव उपक्रम : “SP-ई-संवाद” ऑनलाईन सुविधा सुरू

By Sarkar Maza

May 15, 2026 10:43 am

Ads

आता नागरिकांना घरबसल्या पोलीस अधीक्षकांशी थेट संवाद साधण्याची संधी

अकोला : नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्याच्या उद्देशाने अकोला पोलीस दलामार्फत “SP-ई-संवाद” हा अभिनव ऑनलाईन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या सुविधेमुळे आता नागरिकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाईन माध्यमातून थेट संवाद साधता येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातून दररोज अनेक नागरिक पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारी, निवेदने, सूचना तसेच विविध समस्या घेऊन भेटीसाठी येतात. सकाळी 12 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत पोलीस अधीक्षक स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकतात. मात्र, आता “SP-ई-संवाद” सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या समस्या व तक्रारी मांडण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.या उपक्रमाद्वारे नागरिकांना ऑनलाईन मीटिंगसाठी वेळ निश्चित करता येणार असून, नोंदणीनंतर त्यांच्या ई-मेलवर मीटिंगची लिंक पाठविण्यात येईल.

निर्धारित वेळेनुसार लिंकच्या माध्यमातून नागरिक थेट मा. पोलीस अधीक्षकांशी संवाद साधू शकतील.या सुविधेचा मुख्य उद्देश नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचविणे हा असून, ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोल-डिझेलची बचत करण्यालाही या उपक्रमामुळे मदत होणार आहे.

“SP-ई-संवाद” साठी प्रक्रिया :

➡️ अकोला पोलिसांनी उपलब्ध करून दिलेला QR Code स्कॅन करावाकिंवा

➡️ https://akolaceevisit-code.github.lo/SP-e-Sanvad/⁠� या लिंकला भेट द्यावी

➡️ आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करावी

➡️ ई-मेलवर प्राप्त लिंकद्वारे निश्चित वेळेत ऑनलाईन संवाद साधता येईलअकोला पोलीस दलामार्फत नागरिकाभिमुख, आधुनिक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून, “SP-ई-संवाद” हा उपक्रम त्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

(टीप : नागरिकांना पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे येण्याची सुविधाही पूर्ववत उपलब्ध राहणार आहे.)

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!