Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापुरात व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा, हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप

By Sarkar Maza

May 12, 2026 11:52 am

Ads

मूर्तिजापूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना मूर्तिजापूर शहरात पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून वाद निर्माण झाला आहे. हिंदू धर्मातील देवतांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला असून या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकज लखन अहेरवाल (वय ३०, व्यवसाय कुशन वर्क, रा. मोचीपुरा, ता. मूर्तिजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अंतगत बौध्द बोरकर (वय ४४, रा. चिखली गेट, मूर्तिजापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने आपल्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत हिंदू धर्मातील विविध देवतांबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मजकूर प्रसारित केला. या स्टेटसमध्ये हिंदू धर्मीयांच्या श्रद्धास्थानांबाबत अवमानकारक उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित स्टेटस सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काही नागरिकांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.

ही घटना ११ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास मोचीपुरा परिसरात समोर आली. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मध्यरात्री १२.५० वाजता गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल श्याम मडावी करीत आहेत, तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ पोले यांनी पूर्ण केली.

दरम्यान, सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे मजकूर प्रसारित करणे गंभीर गुन्हा मानला जात असून अशा प्रकारांवर पोलीस प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्ट पुढे प्रसारित न करण्याचे आवाहन केले आहे.

या घटनेमुळे सोशल मीडियावरील जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून धार्मिक विषयांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!