Join WhatsApp group

Ads

-

कुख्यात विज्या पोलिसांच्या तावडीतून फरार; मुर्तिजापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

By Sarkar Maza

May 8, 2026 11:21 pm

Ads

मुर्तिजापूर : गंभीर स्वरूपाच्या विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला विजय मधुकर रोडे (वय २५, रा. धोत्रा शिंदे ता. मुर्तिजापूर) हा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय रोडे याच्याविरुद्ध यापूर्वी चोरी, अपघात, रेल्वे कायदा तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाच्या रिमांड वॉरंटनुसार त्याला अकोला कारागृहात दाखल करण्यासाठी पोलीस कर्मचारी नेत होते.दरम्यान, दिनांक ७ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजताच्या सुमारास मुर्तिजापूर शहर पोलीस ठाणे हद्दीत आरोपीने पोलीस कर्मचारी पवन बोचरे यांच्या हाताला झटका देत पोलिसांच्या कायदेशीर ताब्यातून पळ काढला.

या घटनेनंतर पोलिस विभागात एकच खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस कॉन्स्टेबल साहील मुलानी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वानखडे करीत आहेत.

फोटो – Genrated AI

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!