Join WhatsApp group

Ads

-

४ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार व हत्येचा तीव्र निषेध…! संतप्त नागरिकांचा कँडल मार्च, कठोर शिक्षेची मागणी…

By Sarkar Maza

May 5, 2026 1:04 pm

Ads

मूर्तीजापूर : पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ मूर्तीजापूर शहरात सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत भव्य कँडल मार्च काढला. या वेळी उपस्थितांनी चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करत दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.

या अमानुष घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, मूर्तीजापूर शहरातील नागरिकांनीही या घटनेविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. कँडल मार्चमध्ये महिलांपासून युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “दोषींना फाशी द्या”, “महिलांवरील अत्याचार थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या वेळी नागरिकांनी एकमुखाने मागणी केली की, सदर प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

हा कँडल मार्च कोणत्याही एका पक्षाचा नसून, संपूर्ण समाजाच्या एकजुटीचे प्रतीक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्व धर्म आणि सर्व स्तरातील नागरिकांनी एकत्र येत या अमानवी कृत्याचा निषेध नोंदवला आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी एकदिलाने आवाज उठवला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!