Join WhatsApp group

Ads

अकोला भाजपमध्ये युवा चेहऱ्याला संधी; पंकज राठी चिटणीसपदी ‘युवा + व्यापारी’ फॉर्म्युला

By Sarkar Maza

May 2, 2026 7:59 pm

Ads

अकोला महानगर भाजपने संघटनात्मक पातळीवर नवा संदेश देत युवा चेहऱ्याला पुढे आणण्याचा डाव टाकला आहे. इंजि. पंकज सतीष राठी यांची महानगर चिटणीसपदी नियुक्ती करत पक्षाने आगामी राजकीय गणितांवर लक्ष केंद्रीत केल्याचे संकेत मिळत आहेत.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे मनोनीत सदस्य आणि उद्योजक म्हणून ओळख असलेल्या राठी यांच्या निवडीमुळे व्यापारी वर्ग व नव्या मतदारांमध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ही नियुक्ती माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते, महानगर अध्यक्ष जयंत मसने व रणजित खेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली.

पक्ष संघटनेचा विस्तार, बूथस्तरावर मजबुती आणि विचार घराघरात पोहोचविण्याची जबाबदारी राठी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावरून भाजप अकोल्यात संघटनात्मक पुनर्रचना करत असल्याचेही संकेत मिळत आहेत.दरम्यान, राठी यांनी पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे सांगत जबाबदारी स्वीकारली.

खासदार अनुप धोत्रे, आमदार रणजीत सावरकर यांच्यासह शहरातील वरिष्ठ नेत्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.

एकूणच, भाजपने अकोल्यात ‘युवा + व्यावसायिक’ चेहरा पुढे करत आगामी राजकारणासाठी नवी रणनीती आखल्याचे चित्र दिसत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!