Join WhatsApp group

Ads

बोरगाव मंजूत गोमांस विक्रीचा उच्छाद; पोलिसांचा निष्क्रियपणा उघड

By Sarkar Maza

April 10, 2026 7:30 pm

Ads

बोरगाव मंजू (प्रतिनिधी):बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोरगाव शहरात खुलेआम गोमांस विक्री सुरू असल्याचे वास्तव समोर आले असून, या प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रिय भूमिकेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वेळोवेळी कारवाई केल्याचे पोलीस सांगत असले तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही ठोस बदल दिसत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील काही ठिकाणी दिवसाढवळ्या गोमांस विक्री सुरू असून, याबाबत अनेकदा तक्रारी करूनही पोलीस यंत्रणा प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. “कारवाई फक्त कागदावरच होते का?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कारवाई की दिखावा?

पोलीस प्रशासनाकडून अधूनमधून छापे टाकून गुन्हे दाखल केल्याचे सांगितले जाते. मात्र, काही दिवसांतच पुन्हा तोच व्यवसाय सुरू होत असल्याने या कारवाया केवळ दिखाव्यासाठीच केल्या जात आहेत का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

नागरिकांचा रोष:

“जर पोलीस खरोखरच कठोर कारवाई करत असतील, तर विक्रेते पुन्हा उघडपणे धंदा कसा करतात? त्यांना कायद्याची भीतीच उरलेली नाही का?” असे संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. काहींनी तर या प्रकारामागे स्थानिक पातळीवर संगनमत असल्याचा आरोपही केला आहे.

ठाणेदारांचे म्हणणे:

या संदर्भात आमच्या कडून नेहमी “कारवाई सुरूच आहे” असा नेहमीचा प्रतिसाद मिळत असला, तरी जमिनीवरील परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाची कसोटी:

या प्रकरणामुळे बोरगाव मंजू पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, केवळ औपचारिक कारवाई न करता ठोस आणि सातत्यपूर्ण पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

बेकायदेशीर धंद्यांवर आळा घालण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र असल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!