Join WhatsApp group

Ads

लासूर घाटावर ‘नाईट शिफ्ट’मध्ये अवैध वाळू उत्खनन : कारवाईनंतरही बेभान घाट चालक

By Sarkar Maza

April 8, 2026 11:01 am

Ads

मूर्तिजापूर (प्रतिनिधी) : शासनाच्या नियमानुसार सूर्यास्तानंतर वाळू उपसाचे काम बंद करणे बंधनकारक असताना, लासूर येथील वाळूघाटावर मात्र रात्रीसुद्धा सर्रासपणे वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. घाट चालकांकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जात असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी महसूल प्रशासनाची नजर चुकवून हे काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “रात्रीच्या वेळी नेमकी किती वाळू उपसली जाते?”, “त्या वाहतुकीवर कोणतीही रॉयल्टी आकारली जाते का?”, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

जर ही वाहतूक विनारॉयल्टी होत असेल, तर याचा थेट फटका शासनाच्या महसूलाला बसत असल्याचे स्पष्ट आहे.

यापूर्वीही संबंधित घाट चालकावर मुर्तिजापूर तहसीलदराने कारवाई केल्याची नोंद असताना, तरीदेखील पुन्हा त्याच पद्धतीने नियमांचा भंग करून काम सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

काहींचे हात ओले होत असल्यामुळेच हा सत्र सुरू आहे का? अशीही चर्चा परिसरात रंगत आहे.

एकूणच, लासूर वाळूघाट सध्या अनेक प्रश्नांना जन्म देत असून, महसूल प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या प्रकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

फोटो – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!