Join WhatsApp group

Ads

NH-53 रक्तरंजित! भरधाव आयशरने घेतला क्लीनरचा बळी,

By Sarkar Maza

April 7, 2026 3:02 pm

Ads

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर माना पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम मलकापूर येथील पेट्रोल पंपासमोर 5 एप्रिल 2026 रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालक प्रल्हाद पडोलीया (रा. नागपूर) हे आपल्या मालवाहतूक ट्रकने (क्र. MH 40 BG 0844) भुसावळ येथून नागपूरकडे जात होते. यावेळी मलकापूरजवळील पेट्रोल पंपासमोर त्यांच्या वाहनाला मागून येणाऱ्या आयशर ट्रकने (क्र. MH 40 CT 7229) जोरदार धडक दिली.

सदर आयशर ट्रक चालक रामायण श्रीकांत पांडे (रा. नागपूर) याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या भीषण धडकेत ट्रकमधील क्लीनर भाईलाल द्विवेदी यांना गंभीर दुखापत झाली.

त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच माना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

या प्रकरणी माना पोलीस स्टेशन येथे अपघात क्रमांक 149/2026 नोंदवून भारतीय न्याय संहिता कलम 281, 106(1) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सरोदे करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!