Join WhatsApp group

Ads

ऑन-कॉल डॉक्टर झोपेत? 108 उशिरा, राजकीय दबावामुळे कारवाई रखडली?

By Sarkar Maza

April 7, 2026 2:16 pm

Ads

मूर्तीजापूर तालुक्यात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने आरोग्य व्यवस्थेची पोलखोल केली आहे. 29 मार्च रोजी रात्री साधारण 12.30 वाजता एका महिलेने गळफास घेतल्याची माहिती समोर आली.

घटनेनंतर महिलेला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली, मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने परिस्थिती गंभीर बनली.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र, माना परिसरात 108 रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही, त्यामुळे तब्बल एक तासाचा विलंब झाला.

हा विलंब जीवघेणा ठरू शकला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.दरम्यान, या घटनेत सर्वात मोठा धक्का म्हणजे ऑन-कॉल असलेले डॉ. इम्रान यांनी आपत्कालीन फोन कॉल उचलला नाही. ते घरी झोपेत असल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे, 108 सेवेमध्ये पारंपरिक नोंदवही नसून सर्व नोंदी ऑनलाईन पद्धतीने केल्या जातात, आणि त्या ऑनलाईन रेकॉर्डमध्ये संबंधित डॉक्टर उपस्थित दाखवले गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाला आता राजकीय रंगही चढला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मूर्तीजापूर विधानसभा क्षेत्राबाहेरील एका आमदाराच्या शिफारसीवरून संबंधित डॉक्टरावर निलंबनाची कारवाई करू नये, असा दबाव टाकण्यात आला होता.

इतकेच नव्हे, तर सदर डॉक्टरला पुन्हा ड्युटीवर घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर संबंधित आमदाराच्या स्वीय सहाय्यकाकडून राजकीय दबाव टाकला जात असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाची स्वायत्तता आणि पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संतप्त सवाल असे उपस्थित होत आहे की

ऑन-कॉल डॉक्टर फोन का उचलला नाही?

108 रुग्णवाहिका वेळेत का पोहोचली नाही?

ऑनलाईन रेकॉर्डमध्ये उपस्थित दाखवून प्रत्यक्षात घरी जाऊन झोपला कसा?

राजकीय दबावामुळे या दोषीं डॉक्टरला संरक्षण का?

वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कारवाई रोखली का गेली होती?

जर अशा प्रकारे निष्काळजीपणा आणि राजकीय हस्तक्षेप सुरू राहिला, तर भविष्यात अजून किती जीव धोक्यात येणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. अशा बेजबाबदार डॉक्टरांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!