Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूरात ‘रस्त्याची नवीन डिझाईन–अभियंत्यांची ‘अद्भुत’ किमया!

By Sarkar Maza

April 3, 2026 10:37 am

Ads

“हँडपंप रस्त्याच्या मधोमध कृपया यास विकास समजावा.”

मुर्तिजापूर : लकडगंज ते देवरन मार्ग सिमेंट काँक्रीटमध्ये उभारून विकासाचा डंका पिटणाऱ्या प्रशासनाने आता ‘नवीन प्रयोग’ करून दाखवला आहे. रस्त्याच्या अगदी मध्यभागी हँडपंप कायम ठेवत तयार केलेल्या या रस्त्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.

रस्ता मजबूत, टिकाऊ आणि दर्जेदार—याबाबत कुणालाही शंका नाही. मात्र, त्याच रस्त्याच्या मध्यभागी हॅन्डपंपचा अडथळा ठेवण्याचे ‘अप्रतिम’ नियोजन पाहून नागरिकांनी संबंधित अभियंत्यांना उपरोधिक सलाम ठोकला आहे.

“सरळ रस्त्यावर वाहन चालवणे आता जुने झाले; अडथळे चुकवत चालवण्याची कला शिकवणारा हा रस्ता खरोखरच आदर्श!” अशा शब्दांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हा हँडपंप दिसणे कठीण होते. अशावेळी अपघात होणे केवळ शक्यता नसून, तो एक ‘निश्चित धोका’ असल्याचे नागरिक सांगत आहेत. दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि पादचारी यांच्यासाठी हा रस्ता म्हणजे थेट जीवावर बेतणारा सापळा ठरत आहे.

या ‘अद्वितीय’ कामगिरीबद्दल संबंधित अभियंत्यांचा सन्मान करावा की चौकशी, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. एकीकडे विकासकामांचा गाजावाजा, तर दुसरीकडे अशा उघड चुका—यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांनी तात्काळ हँडपंप हटवून सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, एखादा मोठा अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

“अशा प्रकारच्या नियोजनासाठी कोणत्या विशेष राजकारण्याचे आदेश आहे का? की जेणेकरून त्याचा घरी पाण्याचा पुरवठा खंडित झाला नाही पाहिजे?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!