Join WhatsApp group

Ads

शिवाजीनगरमध्ये मृत्यूचा थरार! दुचाकीची विद्युत खांबाला भीषण धडक; एक ठार, एकाची प्रकृती चिंताजनक पण स्थिर

By Sarkar Maza

April 1, 2026 4:24 pm

Ads

मुर्तिजापूर : शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसर आज भीषण अपघाताने हादरला. भरधाव वेग, क्षणात सुटलेला ताबा आणि जोरदार धडक—या साखळीने एका कुटुंबावर काळाचा घाला घातला.

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जण गंभीर जखमी अवस्थेत जीवाशी झुंज देत आहे.मृतकाचे नाव शरद डोंगरे (वय ४०) असे असून रमेश जामनिक (वय ६०) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही टीपटाळा येथील रहिवासी आहेत. वाई येथे सोयरिक कार्यक्रम आटोपून परत येत असताना नियतीने त्यांच्यावर घाला घातला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात आठवडी बाजाराकडून बायपासकडे ट्रकची वर्दळ सुरू असतानाच, डोंगरे आणि जामनिक हे दुचाकीने समोरून येत होते. अचानक दुचाकीचा ताबा सुटला आणि वाहन थेट विद्युत खांबावर आदळले. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.

अपघातानंतर दोघांनाही तातडीने उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी शरद डोंगरे यांना मृत घोषित केले, तर रमेश जामनिक यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!