Join WhatsApp group

Ads

-

मूर्तिजापूरमध्ये विनयभंग व अत्याचाराचा गुन्हा दाखल; आरोपीवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली कारवाई

By Sarkar Maza

March 29, 2026 10:30 am

Ads

मूर्तिजापूर | प्रतिनिधी

मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात विनयभंग, धमकी व जातीय अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पिडित महिला यांच्या तक्रारीवरून आरोपी विशाल शिंदे (वय अंदाजे 42, रा. गौरक्षण रोड, अकोला) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान वेळोवेळी पिडित महिलेचा इच्छेविरुद्ध शरीरस्पर्श करून विनयभंग केल्याचा आरोप आहे. तसेच, 4 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4.30 ते 5 वाजताच्या सुमारास कोहिनूर हार्डवेअर समोरील रस्त्यावर पिडित महिला फोनवर बोलत असताना आरोपीने तिचा हात पकडून अश्लील मागणी केली.

महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने जातिवाचक अपमानास्पद वक्तव्य करत तिचा अवमान केला आणि “तक्रार दिल्यास जीव मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 74, 75(1)(i)(ii), 296, 351(3) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत कलम 3(1)(r)(s), 3(1)(w)(i)(ii), 3(2)(va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद 28 मार्च 2026 रोजी रात्री करण्यात आली असून, दाखल अधिकारी WHC शालिनी सोळके यांनी प्रक्रिया पूर्ण केली. पुढील तपास ASI नंदकिशोर टिकार करत आहेत.

अशी माहिती ठाणेदार अजित जाधव यांच्याकडून प्राप्त झाली.

न्यूज फोटो -genrated Ai

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!