Join WhatsApp group

Ads

“मैत्रीचे रूपांतर छळात; फोटो व्हायरलची धमकी देणारा आरोपी जाळ्यात”

By Sarkar Maza

March 27, 2026 12:02 pm

Ads

मुर्तीजापूर (प्रतिनिधी)

मुर्तीजापूर शहर पोलीस ठाण्यात एका तरुणीकडे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी दीपक पाटेकर (रा. म्हाडा कॉलोनी, शेगाव, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 78, 351(2) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी यांच्यात पूर्वी मैत्रीचे संबंध होते.

काही कारणांमुळे संबंध तुटल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात संबंधित तरुणीला वारंवार फोन करून त्रास दिला. तसेच, “माझ्याशी संपर्क ठेवला नाही तर तुझे फोटो व्हायरल करीन,” अशी धमकी देत बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

ही घटना १ जुलै २०२५ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मुर्तीजापूर शहरातील अन्नाभाऊ साठे नगर परिसरात घडल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलीसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांपासून सावध राहून, अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती व फोटो शेअर करताना खबरदारी घ्यावी, तसेच कोणतीही धमकी किंवा त्रास होत असल्यास त्वरित पोलीसांत तक्रार करावी, असे आवाहन ठाणेदार अजित जाधव यांच्याकडून करण्यात येत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!