Join WhatsApp group

Ads

डुक्कर पकडण्याच्या कारणावरून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By Sarkar Maza

March 20, 2026 8:20 am

Ads

मुर्तिजापूर, दि. २० – शहरातील स्टेशन विभागात डुक्कर पकडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास मारहाण केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


पोलीस ठाणे मुर्तिजापूर शहर येथे अप. क्र. ३२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 118(1), 351(3), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विशाल श्याम टाक (वय २८, व्यवसाय मजुरी, रा. वाल्मीक नगर, स्टेशन विभाग, मुर्तिजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजताच्या सुमारास सितालामाता मंदिर परिसरात ही घटना घडली. आरोपी चेतन देवीदास मिलांदे, राम देवीदास मिलांदे आणि सोनु मुकुंदे राजपूत (सर्व रा. जुनी वस्ती, मुर्तिजापूर) यांनी संगनमत करून फिर्यादीस डुक्कर पकडण्याच्या कारणावरून काठीने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


फिर्यादीच्या जबानी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत असून, दाखल अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल योगेश लोणकर यांनी कार्यवाही केली आहे.


घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

फोटो – AI Genrated

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!