Join WhatsApp group

Ads

डाबकी रोड खूनप्रकरणी ६ तासांत उलगडा; तिघे आरोपी जेरबंद

By Sarkar Maza

March 19, 2026 5:24 pm

Ads

अकोला | दि. १९ मार्च :

अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात घडलेल्या खुनाच्या गंभीर घटनेचा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उलगडा करत तिन्ही आरोपींना अटक केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

दि. १८ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी शेख तनवीर शेख नासीर (वय १९, रा. भगतवाडी गल्ली क्र. ७, डाबकी रोड) हा आपल्या मित्र शेख मविस अमन मो. आजम (रा. जोगळेकर प्लॉट) याच्यासोबत सिगारेट पिण्यासाठी मुख्य रस्त्यावरील पानपट्टीवर गेला होता. त्यावेळी आरोपी अर्जुन नरेंद्र धनावत हा देखील तेथे उपस्थित होता.

सिगारेट पित असताना किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला.वाद वाढताच आरोपी अर्जुन धनावत याने “तु मेरे तरफ क्या देख रहा” असे म्हणत भांडणास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने फिर्यादी व मृतकावर हल्ला चढवला. या झटापटीदरम्यान शेख मविस याच्या पोटात चाकूने वार करण्यात आला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २३४/२०२६ नुसार कलम १०३, ११५(२), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व विविध पोलीस ठाण्यांच्या मिळून एकूण आठ पथके तयार करण्यात आली. तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपास पुढे नेला.

तपासादरम्यान खदान पोलीस ठाण्याच्या पथकाने अर्जुन नरेंद्र धनावत (वय २३, रा. आश्रय नगर), अनिकेत संजय बाळापुर (वय १८, रा. रेणुका नगर) आणि विशाल दिलीप सिरसोले (वय २३, रा. गायत्री नगर) या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच पोलीस निरीक्षक मनोज केदारे, दीपक कोळी व त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक केल्यामुळे अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!