Join WhatsApp group

Ads

गॅस टंचाईचा कहर; शमशानातील कोळसा हॉटेलमध्ये!

By Sarkar Maza

March 19, 2026 12:31 pm

Ads

न्यूज डेस्क: दिनांक १९ : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई वाढत असल्याचे चित्र आहे. या टंचाईचा थेट फटका हॉटेल व्यवसायाला बसला असून अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत, तर काहींनी पर्याय म्हणून चूल व तंदूरचा वापर सुरू केला आहे. परिणामी, कोळसा व लाकडाची मागणी अचानक वाढून त्याचीही टंचाई भासू लागली आहे.

दरम्यान, या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शमशान घाटातील शव भुजवून तेथून कोळसा काढला जात असून तोच कोळसा हॉटेल व्यावसायिकांना विकला जात असल्याची माहिती एका प्रसारमाध्यमाच्या तपासातून उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा कोळसा सुमारे 2000 रुपयांपर्यंत दराने विकला जात आहे.

अनेक हॉटेल व रेस्टॉरंट चालकांनी पर्याय नसल्याने हा कोळसा खरेदी केल्याचे समजते.तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचा कोळसा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. तरीही यावर संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसत नाही.

एकीकडे गॅस एजन्सीकडून साठा पुरेसा असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने टंचाई कृत्रिमरीत्या निर्माण केली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.या संपूर्ण प्रकारामुळे गॅस पुरवठा साखळी, काळाबाजार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा मुद्दा अधिकच गंभीर बनला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!