Join WhatsApp group

Ads

पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भिंतीलगत ‘खाला’चा अवैध वरली व्यवसाय; शुभम प्लायवूडच्या मागे ‘बाप्पू’चाही धंदा परत सुरू? शहरभर बंदी, तरी दोन ठिकाणी उघडपणे व्यवहार; पोलिसांची डोळेझाक का?

By Sarkar Maza

March 19, 2026 10:58 am

Ads

मूर्तिजापूर : दिनांक १९ : शहरात अवैध ‘वरली’ (जुगार) व्यवसायावर कारवाई होऊन तो बहुतांश ठिकाणी बंद झाल्याचे चित्र असताना, दोन ठिकाणी मात्र हा धंदा उघडपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. एक म्हणजे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अगदी भिंतीला लागून ‘खाला’कडून, तर दुसरे शुभम प्लायवूडच्या मागील भागात ‘बाप्पू’कडून हा अवैध व्यवसाय उघडपणे परत सुरु झाले आहे.

पशुवैद्यकीय दवाखान्यालगतच्या ठिकाणी एजंट खुर्च्या टाकून बसत असून उघडपणे चिठ्ठ्यांचे वाटप करत असल्याचे नागरिक सांगतात. हा सर्व प्रकार पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.स्थानिकांच्या मते, ‘खाला’ एकहातीपणे हा व्यवसाय चालवत असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही दमदाटी केली जात असल्याची चर्चा आहे.

यामुळे दवाखान्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच उपचारासाठी ये-जा करणारे पशुरुग्ण व त्यांचे मालक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा पोलीस प्रशासनाला मौखिक तक्रारी केल्या, मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शुभम प्लायवूडच्या मागील भागात ‘बाप्पू’कडूनही असाच अवैध वरली व्यवसाय सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरात इतरत्र बंदी असताना या दोन ठिकाणीच धंदा कसा सुरू? असा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.

👉 शहरात सर्वत्र बंदी असताना ‘खाला’ आणि ‘बाप्पू’लाच विशेष आशीर्वाद का?

👉 पोलीस ठाण्याच्या जवळच उघडपणे सुरू असलेल्या या व्यवहारांवर कारवाई का होत नाही?

👉 या मागे कोणाचे पाठबळ आहे?या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोन्ही ठिकाणी सुरू असलेला अवैध व्यवसाय बंद करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!