Join WhatsApp group

Ads

--

दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे क्रीडा ग्रेस गुण अर्ज आता ‘आपले सरकार’ पोर्टलवरूनच; 31 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन – सतीशचंद्र भट्ट

By Sarkar Maza

March 12, 2026 8:47 am

Ads

अकोला : दिनांक १२ :

इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य अथवा सहभागाच्या आधारे मिळणाऱ्या ग्रेस गुणांसाठी यावर्षी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून सर्व प्रस्ताव शासनाच्या “आपले सरकार” पोर्टलवरूनच सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये तसेच खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा सवलत गुणांसाठीचे अर्ज ऑनलाईन भरावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी क्रीडा सवलत गुणांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व अर्ज आपले सरकार पोर्टल (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) या संकेतस्थळावरूनच भरावे लागणार आहेत. यापूर्वी ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होत असली तरी आता अर्ज थेट प्रणालीद्वारे शिक्षण मंडळाकडे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करताना विद्यार्थ्यांनी क्रीडा विभागाने निर्धारित केलेले अर्ज नमुने, प्रपत्र १ व २, संबंधित परिशिष्ट, क्रीडा प्रमाणपत्र तसेच १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १० वीचे गुणपत्रक जोडणे अनिवार्य आहे. प्रत्येक खेळाडूला अर्जासोबत रु. ८४ इतके ऑनलाईन शुल्क भरावे लागेल. अर्जामध्ये परीक्षेचा बैठक क्रमांक भरल्यानंतर विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी प्रणालीमध्ये आपोआप दिसणार असल्याने त्यासाठी वेगळे फोटो देण्याची आवश्यकता नसणार आहे.

अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा किंवा संबंधित शिक्षकांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये त्रुटी अथवा अपूर्ण माहिती असल्यास तो प्रस्ताव ऑनलाईनच अपात्र ठरविण्यात येईल आणि त्याबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. त्यामुळे अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची अचूक माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार क्रीडा सवलत गुणांसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग किंवा प्राविण्य मिळविलेले असणे आवश्यक आहे. दहावीमध्ये सवलत घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीत सवलत मिळण्यासाठी अकरावी व बारावीमध्येही खेळात सहभाग किंवा प्राविण्य आवश्यक असते. तसेच केवळ अधिकृत क्रीडा संघटनांच्या स्पर्धांनाच मान्यता दिली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हँडबॉल, ज्युदो, टेबल टेनिस, जलतरण, कबड्डी, कराटे, मल्लखांब, बुद्धिबळ, योगासन, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, कुस्ती, हॉकी, क्रिकेट, खो-खो, रोलर स्केटिंग यांसह अनेक खेळांसाठी क्रीडा सवलत गुण दिले जाणार आहेत.

क्रीडा क्षेत्रात सहभाग अथवा प्राविण्यानुसार विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त २५ गुणांपर्यंत सवलत मिळू शकते.

जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलत गुणांचे प्रस्ताव ३१ मार्च २०२६ पर्यंत आपले सरकार पोर्टलवर सादर करावेत तसेच अर्जाच्या दोन प्रती शाळेकडे जतन करून ठेवाव्यात, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच संबंधित क्रीडा संघटनांनी जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे सविस्तर अहवाल १५ मार्च २०२६ पर्यंत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला येथे सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे क्रीडा ग्रेस गुण अर्ज आता ‘आपले सरकार’ पोर्टलवरूनच; 31 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अकोला :

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!