Join WhatsApp group

Ads

-

हातगाव येथे माजी सैनिकांच्या नेतृत्वात ‘लक्षवेधी धरणे आंदोलन ‘.प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकरी आक्रमक.

By Sarkar Maza

March 12, 2026 8:24 am

Ads

मूर्तिजापूर : दिनांक १२ :

विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज हातगाव रेल्वे पुलाजवळ माजी सैनिक सुरेश जोगळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य ‘लक्षवेधी धरणे आंदोलन’ करण्यात आले. ‘जलयुक्त शिवार २.०’ अंतर्गत रखडलेली कामे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आंदोलकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मात्र, आंदोलनाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी फिरकले नसल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.


आंदोलनातील मुख्य मागण्या:


आंदोलकांनी प्रशासनासमोर ५ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
कमळगंगा नदीचे पुनरुज्जीवन पावसाळ्यापूर्वी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरणाचे काम तातडीने सुरू करावे.


शेत व पाणंद रस्ते.


‘बळीराजा पाणंद रस्ते’ योजनेतील रखडलेली कामे पूर्ण करून रस्त्यांचे खडीकरण करावे.
रेल्वे पुलाखालील रस्ता शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रेल्वे पुलाखालून कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून द्यावा.
दलित वस्ती सुधार योजनेतील २.२५ लाखांच्या निधीचा अपहार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी.
प्रदूषणकारी उद्योग निवासी क्षेत्रातील ‘लक्ष्मी जीनिंग प्रेसिंग’मुळे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी हा उद्योग कायमचा बंद करावा.


प्रशासनाची उदासीनता आणि संताप:


धरणे आंदोलनाच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने केवळ मंडळ अधिकारी, पटवारी व कनिष्ठ अभियंत्यांना पाठवून वेळ मारून नेली. “गट विकास अधिकारी व तहसीलदार हे जनतेच्या प्रश्नांबाबत गंभीर नाहीत,” असा थेट आरोप आंदोलकांनी यावेळी केला.


आंदोलनातील सहभाग:


हे आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी प्रदीप डांगे, शिवा राऊत, अमेय जोगळे, विजय निलखण, विलास सातिंगे, गोपाल तायडे, रोशन भडांगे, शशिकांत सातिंगे, अक्षय भड यांच्यासह शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार!
प्रशासनाने येत्या ८ दिवसांत ठोस कारवाई न केल्यास, हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येईल, असा इशारा सुरेश जोगळे यांनी यावेळी दिला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!