Join WhatsApp group

Ads

--

ऑनलाईन नंबर लागत नाही; हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर गॅस तुटवड्याच्या नावाखाली काळाबाजार!घरगुती सिलेंडर १७०० रुपयांना विक्री

By Sarkar Maza

March 11, 2026 5:10 pm

Ads

न्यूज डेस्क : सध्या संपूर्ण देशात गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याचा तुटवडा जाणवत असताना मात्र काही जणांनी या परिस्थितीचा काही जणांनी सरळ काळाबाजाराचा धंदा सुरू केल्याची धक्कादायक चर्चा रंगू लागली आहे.

सामान्य नागरिक घरगुती गॅस सिलेंडरसाठी ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गॅस कंपनीचा नंबर डायल केला तरी नंबर लागत नाही. अनेक वेळा फोन करूनही बुकिंग होत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घरगुती गॅस मिळवणे म्हणजे जणू काही मोठे युद्ध जिंकण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

याच गोंधळाचा फायदा घेत काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा उघडपणे काळाबाजार सुरू असल्याचे बोलले जात आहे. अधिकृत दर बाजूला ठेवून तब्बल १७०० रुपयांपर्यंत घरगुती सिलेंडरचा दर आकारला जात असल्याची माहिती पुढे येत आहे.

इतकेच नव्हे तर शहरातील अनेक हॉटेल, ढाबे आणि खाद्य व्यवसायांमध्ये कमर्शियल सिलेंडरऐवजी घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर होत असल्याचेही दिसून येत आहे.

कमर्शियल सिलेंडर तुटवडा असल्याने व महाग असल्यामुळे काही व्यवसायिक घरगुती सिलेंडर वापरून व्यवसाय करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

एकीकडे सामान्य नागरिकांना गॅस बुकिंगसाठी नंबर लागत नाही, तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरचा काळाबाजार आणि व्यावसायिक वापर सुरू असल्यामुळे गॅस वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सिलेंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.त्यामुळे

त्यामुळे आता पुरवठा विभाग, जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तपास करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जर वेळेत कारवाई झाली नाही तर गॅस तुटवड्याच्या नावाखाली सुरू असलेला हा काळाबाजार आणखी बोकाळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!