Join WhatsApp group

Ads

--

घरकुल वाटपातून मूर्तिजापूरमध्ये विकासाची नवी दिशा : नगराध्यक्ष हर्षल साबळे यांच्या हस्ते घरकुलांचे वितरण

By Sarkar Maza

March 11, 2026 9:22 am

Ads

मूर्तिजापूर : दिनांक ११ : स्वतःच्या हक्काचे घर असावे हे प्रत्येक कुटुंबाचे आयुष्यभराचे स्वप्न असते. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरिब कुटुंबांसाठी घरकुल ही केवळ भिंती-छप्पर नसून सुरक्षितता, सन्मान आणि स्थिर आयुष्याची हमी असते. याच पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहरात ‘प्रधानमंत्री आवास योजना’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरांचे वितरण करण्यात आले.

सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करणारे आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून मूर्तिजापूरचे नगराध्यक्ष हर्षल साबळे यांची ओळख निर्माण झाली आहे. लोकाभिमुख कामकाज, साधेपणा आणि विकासाचा ध्यास यामुळे ते शहरातील नागरिकांच्या मनात विशेष स्थान मिळवत आहेत.

नगर परिषद येथे आयोजित कार्यक्रमाला मुख्याधिकारी (CEO), उपनगराध्यक्ष रोहितभाऊ अव्वलवार, नगर अभियंता संकेत तालकोकुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी लाभार्थ्यांसोबत सविस्तर बैठक घेऊन त्यांच्या समस्या, अडचणी तसेच घरकुल संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. लाभार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

घरकुल योजना ही गरिब कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते. अनेक वर्षे भाड्याच्या घरात किंवा झोपडीत राहणाऱ्या कुटुंबांना या योजनेमुळे सुरक्षित आणि स्थिर निवारा मिळतो. स्वतःचे घर मिळाल्याने कुटुंबाचा आत्मविश्वास वाढतो तसेच मुलांच्या शिक्षणापासून ते कुटुंबाच्या भविष्यासाठीही ही मोठी आधारभूत बाब ठरते. –

दरम्यान, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती राहुलजी गुल्हाने यांनी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

सामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करणे आणि प्रत्येक गरजू कुटुंबाला स्वतःचे घर मिळवून देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे अनेक गरिब कुटुंबांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!