Join WhatsApp group

Ads

-

नियमांची अंमलबजावणी करताना वाद; वातावरण शांत ठेवण्यासाठी सचिव मडगे यांची समजूतदार भूमिका, व्यापाऱ्यांसमोर व्यक्त केली खंत

By Sarkar Maza

March 11, 2026 8:26 am

Ads

मुर्तिजापूर : दिनांक ११ :

कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तिजापूर येथे “कार्टर-कोंबडी” मागणीच्या आरोपांवरून निर्माण झालेल्या वादाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात बाजार समिती प्रशासनाकडून वेगळीच वस्तुस्थिती समोर येत असल्याचा दावा करण्यात आला असून, हा संपूर्ण प्रकार कारवाईच्या भीतीपोटी उभा करण्यात आल्याचा आरोप समिती प्रशासनाने केला आहे.माहितीनुसार, बाजार समिती परिसरात “राजेश फीड्स” या नावाने एक दुकान चालवले जात आहे.

मात्र समितीच्या नोंदी तपासल्यानंतर हे दुकान प्रत्यक्षात कुणाल शिंदे यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांनुसार दुकानाचे थेट हस्तांतरण किंवा परवानगीशिवाय दुसऱ्या व्यक्तीकडून चालविणे मान्य नसते. त्यामुळे नियमभंग झाल्याची शक्यता लक्षात घेऊन समिती प्रशासनाने संबंधितांना रीतसर नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते.

या नोटीसनंतर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाल्याने काही व्यापाऱ्यांनी सचिव मडगे यांच्यावर तोंडी आणि खोटे आरोप करत आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या “राजेश फीड्स” या नावाने दुकान चालवणारे व्यापारी बाजार समितीच्या नोंदीप्रमाणे अधिकृत भाडेकरू नसल्याची बाबही तपासात समोर आली आहे.

त्यामुळे नियमभंगाबाबत पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.समितीचे सचिव मडगे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “बाजार समितीच्या नियमांचे पालन करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. दुकान हस्तांतरणाच्या प्रकरणात नियमभंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांना नोटीस देण्यात आली.

त्यानंतर काही जणांनी आकसापोटी आंदोलन करून आरोप करण्याचा प्रयत्न केला.”दरम्यान, या वादामुळे काल बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम पसरू नये आणि बाजार समितीतील सुरू असलेल्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी समजूतदारपणाची भूमिका घेत सचिव मडगे यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढत माफी मागितली.

प्रशासनाने स्पष्ट केले की, बाजार समितीतील वातावरण बिघडू नये आणि व्यापारी वर्गाला त्रास होऊ नये यासाठी संवादाच्या माध्यमातून हा वाद नियमांच्या चौकटीत सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, नियमभंगाच्या आरोपांबाबत चौकशी सुरू असून पुढील निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!