Join WhatsApp group

Ads

-

मुख्यालयात नसतानाही कागदावर हजेरी : आरोग्य विभागातील धक्कादायक प्रकार उघड

By Sarkar Maza

March 8, 2026 8:51 am

Ads

अकोला | प्रतिनिधी : दिनांक ०८ :
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत काही आरोग्य सेवक मुख्यालयात वास्तव्यास नसतानाही कागदोपत्री मुख्यालयात राहत असल्याची खोटी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आकाश कोकाटे यांनी केला आहे.

नियमांनुसार आरोग्य सेवकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मुख्यालयात राहणे बंधनकारक असते. मात्र काही आरोग्य सेवक मुख्यालय सोडून इतरत्र राहत असून कागदोपत्री मुख्यालयातच असल्याचे दाखवत असल्याची चर्चा जिल्हा परिषद व आरोग्य विभागात सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून खोटी माहिती देणाऱ्या आरोग्य सेवकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आकाश कोकाटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रकरणात तातडीने कारवाई केली नाही तर तक्रार करून १६ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोकाटे यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

या आरोपांमुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून “मुख्यालयात नसतानाही पगार कसा मिळतो?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता प्रशासन दोषींवर कठोर कारवाई करते की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!