Join WhatsApp group

Ads

-

अकोल्यात ठाकरे गटाच्या शहर प्रमुखावर प्राणघातक हल्ला; अज्ञातांनी कारच्या काचा फोडल्या, आमदार नितीन देशमुखांचा गंभीर आरोप

By Sarkar Maza

March 2, 2026 7:07 am

Ads

अकोला : दिनांक ०२ : अकोला शहराच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. अकोल्यात उद्धव ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. अकोला शहराच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे.

अकोल्यात उद्धव ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. तीन अज्ञातांनी शहर प्रमुखाच्या बुलोरो वाहनाच्या काचा फोडल्याची प्राथमिक माहिती आहे. सोबतच हातात तलवार आणि लोखंडी पाईपाने ही तोडफोड केलीय. शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख राहुल कराळे हे मोठ्या उमरीतील आपल्या घराजवळ आल्यानंतर आपल्या बुलोरो वाहणात बसले असतांना हि खळबळजनक घटना घडलीय.

कराळे यांच्या बुलोरो वाहनावर तिघांनी तलवार आणि पाईपाने हल्ला चढवत वाहनाच्या काचा फोडल्याय. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरात कैद झाला आहे. सध्या CCTV फुटेज वरून हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

सुपारी घेत त्यांना कायमच संपवण्याचं हल्लेखोरांचा डाव –

मिळालेल्या माहितीनुसार, शहर प्रमुख राहुल कराळे यांची सुपारी घेत त्यांना कायमच संपवण्याचं हल्लेखोरांचा डाव होता. मात्र ते वाहणाच्या बाहेर न आल्याने हल्लेखोरांचा रोष वाहनावर दिसून आला. तर 12 तासात हल्लेखोरांना अटक करा, अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे. तर हल्लेखोरांचा गोळीबार करण्याचा डाव होता. हत्याचा कट रचला जात आहे, पोलिसांना माहिती दिली. मात्र एक तास पोलीस उशिरा आले, असा आरोप कराळे यांनी केला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!