Join WhatsApp group

Ads

-

मुर्तीजापुरात ॲक्युप्रेशर वायब्रेशन थेरपी शिबिराचे आयोजन

By Sarkar Maza

February 21, 2026 5:15 pm

Ads

मुर्तीजापुर : अग्रवाल समाज, पुंडलिक बाबा गौरक्षण संस्था तसेच सत्संग भवन मुर्तीजापुर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ॲक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग ट्रीटमेंट संस्था, जोधपूर (राजस्थान) यांच्या विशेष सहकार्याने शहरात ॲक्युप्रेशर वायब्रेशन सुयोग चिकित्साथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


हे शिबिर शनिवार, दिनांक 21 फेब्रुवारी ते गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान सत्संग भवन, स्टेशन परिसर, मुर्तीजापुर येथे आयोजित करण्यात आले असून सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 3.30 ते 7.30 या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.


या शिबिरामध्ये कोणतीही औषधे न देता विविध आजारांवर ॲक्युप्रेशर व वायब्रेशन थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जाणार आहेत. गुडघेदुखी, कंबरदुखी, सायटिका, स्थूलपणा, जुने दुखणे, डोळ्यांचे विकार, थायरॉईड, उच्च रक्तदाब, मधुमेह (शुगर), व्हेरिकोज व्हेन्स, लकवा, मस्से, मानसिक तणाव, हात-पायांना मुंग्या येणे आदी विविध आजारांवर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.


या शिबिरासाठी राजस्थान येथील तज्ज्ञ चिकित्सकांची टीम उपस्थित राहणार असून शहरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिबिराचे प्रमुख जितेंद्र चौधरी व प्रकाश चौधरी तसेच अग्रवाल समाज, पुंडलिक बाबा गौरक्षण संस्था व सत्संग भवन मुर्तीजापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!