Join WhatsApp group

Ads

आत्मसंरक्षणासोबत शिस्तीचा धडा – शिवराज स्पोर्ट्स क्लबची कराटे बेल्ट परीक्षा यशस्वी

By Sarkar Maza

February 17, 2026 4:51 pm

Ads

ठाणे : दिनांक १७ : शिवराज स्पोर्ट्स क्लब येथे कराटे बेल्ट परीक्षा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतील १८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत पुढील बेल्टसाठी पात्रता मिळवली.
या परीक्षेसाठी महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर नवनीत वारथे सर विशेष उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा पार पडली.


निकाल पुढीलप्रमाणे :
ऑरेंज बेल्ट – राज शिंदे, स्वरित मांडिरे, सहर्ष सांगळे, सलोनी कदम, विराज सिंग, सरी कदम, ओम साहू, शव्य यादव, दिया गंगारकर, शिव शर्मा, स्रावणी कदम, सलोनी कदम
ब्लू बेल्ट – मंजिरी कोकरे
यलो बेल्ट – अमन त्रिभाके, मुदगल, परी कमळे, किंजल गोदसे, आरव कमळे

या यशस्वी आयोजनासाठी शिवराज स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष व सेन्सेई अमर तळोकार सर, बाबलू बहोरिया सर आणि नितेश बहोरिया सर यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.


विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत, प्रशिक्षकांचे परिश्रम आणि पालकांचे पाठबळ महत्त्वाचे ठरले.
तसेच या उपक्रमासाठी सेंट मेरी स्कूलचे अध्यक्ष रवि पाटील सर आणि आदित्य पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कराटेसारख्या क्रीडाप्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षणाची भावना, शिस्त आणि आत्मविश्वास वाढीस लागतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!