Join WhatsApp group

Ads

-

माथेरोलीतील वादाचा राजकीय रंग; राऊतांच्या पोस्टनंतर नार्वेकरांचे स्पष्टीकरण

By Sarkar Maza

February 15, 2026 5:27 pm

Ads

न्यूज डेस्क: दिनांक १५ : अलिबागजवळील माथेरोली गावात जमीन वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

या व्हिडिओमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिसत असल्याचा दावा करण्यात आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी तो व्हिडिओ ‘X’वर पोस्ट करत नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणावर विविध चर्चांना उधाण आले असताना राहुल नार्वेकर यांनी स्वतः पुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत राहुल नार्वेकर जमीन मोजणीसाठी अधिकाऱ्यांसोबत आले होते, घरात कोणी नसताना मोजणी करण्यात आली आणि त्यामुळे गोंधळ उडाला, असा आरोप करण्यात आला. या घटनेतूनच मारहाण आणि वाद निर्माण झाल्याचा दावा राऊत यांनी केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.

राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण

या सर्व आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली बाजू मांडली.
त्यांनी म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी ते त्यांच्या शेताकडे जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसले. त्या वेळी त्यांनी केवळ दोघांनाही शांततेने वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि पुढे निघून गेले. त्या जमीन वादाशी किंवा गोंधळाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विनाकारण आपले नाव या घटनेशी जोडू नये, अशी नम्र विनंतीही त्यांनी केली आहे.

राजकीय चर्चांना उधाण

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून टीका सुरू झाली असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सूर चढला आहे. दरम्यान, नार्वेकर यांच्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!