Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापूरमध्ये खळबळजनक घटना : खुल्या गटारात सापडला मृतदेह

By Sarkar Maza

February 14, 2026 7:45 pm

Ads

मूर्तिजापूर : दिनांक १४ : शहरातील ५२ गेट परिसरातून गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेले संजय तुळशीराम कोकाटे (वय ५५) यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गाडेकर लेआऊट लगत असलेल्या खुल्या जागेतील सांडपाण्याच्या गटारात हा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडेकर लेआऊटमधील एका रहिवाशाला परिसरात साफसफाई करत असताना तीव्र दुर्गंधी जाणवली. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता गटारात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात हा मृतदेह संजय कोकाटे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले असून ते मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची नोंद होती.

या प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घातपाताचा संशय आहे का यासह सर्व शक्यतांचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात अशा अवस्थेत मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!