Join WhatsApp group

Ads

-

मुर्तीजापूर–कारंजा मार्गावर भीषण अपघात : भरधाव कार रस्त्याखाली कोसळली, दोघांचा मृत्यू; तिघे गंभीर

By Sarkarmzanews

February 5, 2026 8:19 pm

Ads

मुर्तीजापूर : दिनांक ०५ : मुर्तीजापूर कडून कारंजा लाडचा दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्याखाली कोसळून भीषण अपघात झाला.

ही घटना आज सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास उमरी येथे घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच मुर्तीजापूर येथील आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक माहितीनुसार यशवंत राठोड (वय ३१), अक्षय रोकडे (वय २७) व ओम मुंदे (वय १९) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा उपचार केंद्र, अकोला येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या भीषण अपघातात रोहित रिक (वय २५) व संकेत मेश्राम (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातातील सर्वजण कारंजा लाड येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!