Join WhatsApp group

Ads

--

मुर्तिजापूरात ४.६४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन खासदार धोत्रे अध्यक्षस्थानी; आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते शुभारंभ

By Sarkarmzanews

February 5, 2026 6:39 pm

Ads

मुर्तिजापूर, दि. ५ फेब्रुवारी – मुर्तिजापूर नगर परिषद हद्दीत विविध प्रभागांतील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ४.६४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आज सकाळी ११.३० वाजता उत्साहात पार पडले.

oplus_0

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. अनुप संजय धोत्रे होते, तर मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. हरीश मारोती आप्पा पिंपळे यांच्या हस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष हर्षल रामेश्वर साबळे, उपनगराध्यक्ष रोहित अवल्वार तसेच शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, नाल्या, संरक्षण भिंती व हरित उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे नमूद केले.

प्रमुख मंजूर कामांचा आढावा

  • प्रभाग क्र. ५ व ७ मध्ये न.प.च्या खुल्या जागेत संरक्षण भिंतीचे बांधकाम – प्रत्येकी रु. १० लक्ष
  • प्रभाग क्र. ८ मध्ये संजय वानखडे ते अतुल डोंगरे व अमोल डोंगरे ते सतीश खडसे घरापर्यंत रस्ते – प्रत्येकी रु. १० लक्ष
  • प्रभाग क्र. ७ दातार लेआऊट येथे नाली बांधकाम – रु. १० लक्ष
  • प्रभाग क्र. १० मातंगपुरा व अण्णाभाऊ साठे नगर येथे नाल्यांची कामे – प्रत्येकी रु. १० लक्ष
  • प्रभाग क्र. १ मध्ये नालीसह रस्त्याची कामे – रु. ३५ लक्ष व रु. १०० लक्ष
  • प्रभाग क्र. ७ महालक्ष्मी मंगल कार्यालय परिसरात पेव्हर बसविणे – रु. १७ लक्ष
  • धामणगाव फेल येथे रस्ता व नाली – रु. २० लक्ष
  • “एक पेड़ माँ के नाम” उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड – रु. ७ लक्ष
  • प्रभाग क्र. २, ८ व १२ मध्ये काँक्रीट रस्त्यांची कामे – रु. १६ लक्ष ते ७६ लक्ष दरम्यान

यावेळी खासदार धोत्रे व आमदार पिंपळे यांनी भविष्यातही शहरासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे सांगितले. नगराध्यक्ष साबळे यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

या विकासकामांमुळे शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!