Join WhatsApp group

Ads

-

“गावातच चौकशी, अधिकाऱ्यांची पळापळ; कारवाई अटळ?”

By Sarkarmzanews

January 29, 2026 9:55 am

Ads

अकोला : दिनांक २९ :

मोरगाव भाकरे (ता. जि. अकोला) येथील ग्रामपंचायतीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात अडकला असून, कथित भ्रष्टाचार, मनमानी निर्णय आणि नियमबाह्य कामकाजाच्या तक्रारींमुळे जिल्हा परिषद प्रशासनाची झोप उडाली आहे.

उपसरपंच सौ. अर्चना गजानन चोपडे यांनी वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर हे प्रकरण चव्हाट्यावर आले.

आता जिल्हा परिषद अकोलाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी थेट हस्तक्षेप करत चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.

ही समिती २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता मोरगाव भाकरे ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष हजर राहून चौकशी करणार आहे.

विशेष म्हणजे आदेशात “कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी गैरहजर राहणार नाही” असा स्पष्ट व कडक इशारा देण्यात आला असून, नियमभंग झाल्यास थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात आधीच गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. आता या चौकशीतून

— कोणाचे धाबे दणाणणार?

— कोणावर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार?

— की प्रकरण पुन्हा एकदा फाईलमध्येच दडपले जाणार?

असा थेट सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

ही चौकशी फक्त कागदोपत्री औपचारिकता ठरणार की भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणारी ठरणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

प्रशासन “सत्य बाहेर येणारच” असे सांगत असले, तरीग्रामस्थ आता फक्त आश्वासन नव्हे — ठोस कारवाईची वाट पाहत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!