Join WhatsApp group

Ads

महापौरपदासाठी सौ. शारदा रणजीत खेडकर, उपमहापौरपदासाठी अमोल गोगे यांची उमेदवारी जाहीर

By Sarkarmzanews

January 26, 2026 7:26 pm

Ads

अकोला : दिनांक २६ : अकोला शहर सुधार विकास आघाडीच्या वतीने भारतीय जनता पक्षाने महापौर व उपमहापौर पदासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

महापौरपदासाठी सौ. शारदा रणजीत खेडकर तर उपमहापौरपदासाठी अमोल गोगे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

ही घोषणा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी खासदार अनुप धोत्रे, पालक मंत्री तथा कामगार मंत्री ॲड. आकाश पुंडकर, आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल (माजी महापौर), जिल्हाध्यक्ष शिवरकर, गटनेते पावन महल्ले यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असून अनुभवी व सक्षम नेतृत्व देण्याच्या दृष्टीने हे उमेदवार जाहीर करण्यात आल्याचे यावेळी पक्षनेत्यांनी सांगितले. अकोल्याच्या विकासाला गती देण्यासाठी महापौर व उपमहापौर पदाच्या माध्यमातून प्रभावी कामकाज केले जाईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या घोषणेमुळे अकोला शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच हालचाल निर्माण झाली असून आगामी महापौर निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!