Join WhatsApp group

Ads

-

ना पैसा, ना सौदेबाजी : संघर्षातून घडलेले स्वीकृत नगरसेवक राम जोशी

By Sarkarmzanews

January 14, 2026 5:05 pm

Ads

“राजकारणात पैसा आणि सत्ता नसली तर काहीच होत नाही” हा गैरसमज राम जोशी यांच्या प्रवासाने खोटा ठरवला आहे. चहा विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा हा सामान्य कार्यकर्ता आज भाजपचा स्वीकृत नगरसेवक झाला आहे, ही केवळ पदोन्नती नाही तर २५ वर्षांच्या संघर्षाची पावती आहे.

शिवसंग्राम संघटनेपासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास कधीही सोपा नव्हता.

आंदोलनं, निवेदनं, अन्यायाविरोधात थेट प्रशासनाशी दोन हात, अधिकाऱ्यांच्या तोंडावर शाई फेकण्यापर्यंतची आक्रमक भूमिका, नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात काढलेली प्रेतयात्रा — या सगळ्या घटना त्यांच्या लढाऊ स्वभावाची साक्ष देतात.

राजकारण म्हणजे केवळ भाषणं नाहीत, तर प्रसंगी जीव धोक्यात घालून उभं राहणं असतं, हे राम जोशींनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं.

मित्रासाठी पोटावर घाव घेऊन मृत्यूच्या दाढेतून परत आलेला हा कार्यकर्ता आजही आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता उभा आहे, ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचा टप्पा पार करत अखेर भाजपमध्ये प्रवेश आणि आज स्वीकृत नगरसेवक पदापर्यंत मजल — या संपूर्ण प्रवासात विशेष बाब म्हणजे कोणत्याही मोहाला बळी न पडता, कोणताही पैसा खर्च न करता त्यांनी आपली वाट चालत ठेवली.

आजच्या काळात अशी उदाहरणं दुर्मिळच.

अशा या राजकीय हिऱ्याची ओळख आमदार हरीश पिंपळे यांना झाली आणि त्यांनी राम जोशी यांच्या संघर्षाची दखल घेत स्वीकृत नगरसेवक पदापर्यंत त्यांना पोहोचवलं.

हा निर्णय म्हणजे कार्यकर्तृत्वाला दिलेली दाद आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

राम जोशी यांचा हा प्रवास अनेक सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. सत्ता ही केवळ श्रीमंतांची मक्तेदारी नाही, तर ती प्रामाणिक संघर्षातूनही मिळू शकते, हा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!