Join WhatsApp group

Ads

वंचितचा सिलेंडर निवडणुकीनंतर लीक? स्वीकृत नगरसेवक पदावरून घमासान; शेख इम्रान–तसवर खान यांचे आरोप प्रत्यारोप

By Sarkarmzanews

January 14, 2026 2:51 pm

Ads

मुर्तिजापूर |दिनांक १४ :

वंचित बहुजन आघाडीच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून शहरातील राजकारण तापले असून या वादामुळे पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

संजय डागा यांची वंचितकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याने हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे.

वंचितकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले शेख इम्रान काही मतांनी नगराध्यक्ष पदाचा पराभव झाले होते मात्र पक्षाने यांना परत स्वीकृत सदस्य म्हणून घेण्याचे आश्वासन व पत्र दिले.

मात्र गट नेत्याचा राजकीय घडामोडींमुळे माझी संधी हिरावून घेण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे.

शेख इम्रान यांना वंचित पक्षाने स्वीकृत नगरसेवक पदासाठी अधिकृत पत्र दिले होते, असा त्यांचा दावा आहे.

मात्र काही मतांनी नगराध्यक्ष पदाचा पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत घडामोडींमुळे आपली संधी हिरावून घेण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे.

शेख इम्रान यांच्या म्हणण्यानुसार, नवनिर्वाचित वंचित नगरसेवक व गट नेता तसवर खान यांनी विश्वासघात केला असून अप्रत्यक्षरीत्या संजय डागा यांना वंचितकडून बिनविरोध स्वीकृत नगरसेवक बनवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

या वर तसवर खान यांचे प्रत्युत्तर

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना गटनेते तसवर खान यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

“संजय डागा हे भाजपचे पदाधिकारी नाहीत आणि त्यांचा भाजपशी कोणताही थेट संबंध नाही. एक समाजसेवक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, “निवडणूक काळात शेख इम्रान यांच्याकडून काही गैरसमज झाले. जुन्या वस्ती प्रभागातून आम्ही वंचितचे सहा नगरसेवक निवडून दिले. मात्र स्टेशन भागासह काही परिसरात शेख इम्रान यांचा चुकीच्या व्यवस्थापनामुळे पराभव झाला. वंचितचा गड समजल्या जाणाऱ्या प्रभागातूनही उमेदवार पडले, हे वास्तव आहे.”

छुप्या भाजप समर्थनाचे आरोप

वंचितचा एक नगरसेवकाने शेख इम्रान यांच्यावर उलट आरोप करत सांगितले की,“निवडणूक काळात छुप्या पद्धतीने शेख इम्रान यांनी भाजपला समर्थन दिल्याची वंचित पक्षांतर्गत चर्चा आहे.

स्वतः स्वीकृत नगरसेवक बनण्यासाठी भाजपशी हातमिळवणी करून आम्हालाही आमिष दाखवण्याचे प्रयत्न झाले.

योग्य वेळ आल्यास पक्षाच्या बैठकीत याबाबत पुरावे सादर केले जातील. आमची बदनामी जर अशीच सुरू राहिली, तर हे सर्व सार्वजनिक करू.”

पत्राच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, शेख इम्रान यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या पत्रावर कोणतीही तारीख किंवा आवक-जावक क्रमांक नसल्याचा दावा तसवर खान यांनी केला असून, त्यामुळे त्या पत्राच्या अधिकृततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मात्र संजय डागा शांत

या संपूर्ण वादात स्वीकृत नगरसेवक संजय डागा मात्र पूर्णपणे मौन बाळगून आहेत, ही बाबही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी खरे काय ते योग्य वेळ आल्यावर स्पष्ट होईल, असे चित्र आहे. तोपर्यंत वंचितमधील अंतर्गत कलहाने शहराचे राजकारण चांगलेच तापवले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!