Join WhatsApp group

Ads

---

मुर्तीजापुर शहरात नायलॉन मांजाची विक्री; महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By Sarkarmzanews

January 10, 2026 2:50 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक १० :मुर्तीजापुर शहरात जीवितास धोका पोहोचवणाऱ्या नायलॉन मांजाची विक्री करत असल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते २.३० वाजेदरम्यान करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सराफा बाजारातील राधिका ज्वेलर्स समोर आरोपी जयश्री संतोष तामसे (वय ३५, रा. चिखली गेट, मुर्तीजापुर) हिच्या दुकानात नायलॉन मांजाच्या रील विक्रीसाठी ठेवलेल्या आढळून आल्या. सदर नायलॉन मांजा हा नागरिक तसेच पक्ष्यांच्या जीवितास गंभीर धोका पोहोचवणारा असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

या कारवाईत आरोपीकडून नायलॉन मांजाच्या एकूण १० रील जप्त करण्यात आल्या असून प्रत्येकी २५० रुपये किंमतीप्रमाणे एकूण किंमत २,५०० रुपये आहे.

या प्रकरणी मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुरेश पांडे (बॅज नं. १०९९) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध अप.क्र. १५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२५, २२३, २९२ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ४, ५ व १५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई स्टे. दा. अमलदार हेड कॉन्स्टेबल श्याम बन (बॅज नं. २२३३) यांनी डे ऑफिसर API पवार यांच्या आदेशानुसार केली असून पुढील तपास मुर्तीजापुर शहर पोलीस करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!