Join WhatsApp group

अकोला पोलिस दला कडुन एका महिण्यामध्ये ३०६६ तक्रारीचे निराकरण

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक : 17 : अकोला जिल्हा पोलिस दला तर्फे तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा आयोजन अनुषंगाने अकोला पोलिस दलातर्फे नागरीकांचे तक्रारीचे निराकरण करण्याससाठी दररोज तसेच दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन अकोला जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन ला मोठया प्रमाणात तक्रार निवारणाची प्रकीया श्री बच्चन सिंह पोलिस अधिक्षक अकोला यांचे नेतृत्वात राबविण्यात येत आहे.

अकोला जिल्हयात ०१ जानेवारी २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२५ पावेतो अकोला जिल्हयातील उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग अकोला, अकोट, बाळापुर व मुर्तिजापुर या उप विभागात व प्रत्येक पोलिस स्टेशनला दररोज नागरीकांचे समस्या तसेच तक्रारीचे निराकरण करण्यात येत आहे.

दर शनिवारी तक्रार निवारण दिन म्हणुन साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये नागरीकांनी दिलेल्या तक्रारी व किरकोळ स्वरूपाचे वाद याचे निराकरण, दोन्ही तक्रारदार यांना समक्ष बोलावुन त्यांचे तक्रारीचे समाधान करून वाद संपुष्टात आणल्या जात आहे. अकोला जिल्हयात ०१ जाने २०२५ पासुन आजपर्यत शहर विभाग अकोला येथे १८३९, अकोट उपविभागात ३०९, बाळापुर उपविभागात ५४८, मुर्तिजापुर उपविभागात ३७० तकरी असे एकुण ३०६६ तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात आला आहे.

सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सतिश कुळकर्णी शहर विभाग, श्री अनमोल मित्तल सहायक पोलिस अधिक्षक, अकोट, श्री गजानन पडघान उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापुर, श्री मनोहर दाभाडे उपविभागीय पोलिस अधिकारी, मुर्तिजापुर विभाग तसेच सर्व ठाणेप्रभारी अकोला जिल्हा यांचे मार्गदर्शनात तक्रारदाराचे तक्रारीचे निवारण करण्यात येत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!