Join WhatsApp group

मोदी सरकार ची ११ वर्षे सेवा, सुशासन व ग़रीब कल्याण ला समर्पित – सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी, आमदार रणधीर सावरकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १४ जून २५ : अकोला : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारची ११ वर्षे सेवा, सुशासन व ग़रीब कल्याण ला समर्पित आहेत. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पाकडून सिद्धीकडे नेणारी ही ११ वर्षे असून जनकल्याणासाठी संकल्प, प्रयत्न आणि समर्पणाचा “सुवर्णकाळ” मोदी सरकारमुळे सर्वांना अनुभवता येत आहे . मोदी सरकारने मागच्या ११ वर्षांत केलेल्या अद्वितीय कार्याची नोंद सुवर्णाक्षरात केली जावी अशा शब्दांत भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी मोदी सरकारच्या ११ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित संवाद परिषदेत मोदी सरकारच्या ११ वर्षांतील कार्याची प्रशंसा केली . यावेळी श्री.रणधीर सावरकर यांनी मोदी सरकारने महिला, युवा, शेतकरी ,दलित, आदिवासी, ओबीसी घटक यांच्या कल्याणासाठी आणलेल्या विविध योजना तसेच सरकारच्या कामगीरीचा आढावा ही घेतला.


आमदार श्री.रणधीर सावरकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करत विकासाचे युग सुरू केले आहे. भ्रष्टाचार , घोटाळे ,तुष्टीकरणाची जागा जबाबदारी, पारदर्शकता आणि विकासाने घेतली आहे. मागच्या ११ वर्षात ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मूलमंत्रानुसार मोदी सरकारने मोठे कार्य करत विकास , अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले. डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण, संरक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय कामगीरी केली आहे. गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी या चार घटकांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसून येत असल्याचे ही आमदार श्री.रणधीर सावरकर यांनी नमूद केले.


गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने घरे, शौचालये, गॅस जोडण्या, पेयजल, वीज, दरमहा 5 किलो धान्य 81 कोटी जनतेला आणि 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा देशातील गरीब ,गरजू लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘अंत्योदय’ संकल्पनेनुसार, सरकारने समाजातील अखेरच्या घटकाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या. यामध्ये ‘उज्ज्वला योजना’, ‘प्रधानमंत्री आवास योजना’ आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ यांचा समावेश आहे.२५ कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर काढल्याचेही श्री रणधीर सावरकर यांनी सांगितले .


महिलांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणून मागची ११ वर्षे महिलांच्या प्रगतीचा काळ असल्याचे श्री. यांनी सांगितले. 30 कोटी मुद्रा योजना कर्जे ही महिला उद्योजकांना देण्यात आली.उच्च शिक्षणासाठीची महिलांची नोंदणी 28 टक्क्यांनी वाढली आहे. स्टेम कोर्सेसमध्ये मुली व महिलांच्या नोंदणीचे प्रमाण जगात सर्वोच्च म्हणजे 43 टक्के आहे. पीएम आवास योजनेखालील ७० टक्क्यांहून अधिक घरे महिलांच्या नावे आहेत. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा करत महिलांना न्याय दिला , मातृ वंदना योजनेचा 3.98 कोटी महिलांना लाभ मिळाला आहे.


नवीन शैक्षणिक धोरण, कौशल्य विकास आणि स्टार्टअप्सवर लक्ष केंद्रित केल्यामुळे युवा वर्ग विकसित भारताच्या संकल्पात सहभागी होऊ शकला आहे . सरकारने ११ वर्षात १७ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण केल्या. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट , युवकांसाठी मोफत शिक्षण, १.४२ कोटींना प्रशिक्षण याचा लाभ तरूण वर्गाला होत आहे.
शेतकरी कल्याणासाठीही मोदी सरकार सातत्याने काम करत आहे. गेल्या अकरा वर्षांत पिकांच्या हमीभावात सातत्याने वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान किसानच्या अंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात 3.7 लाख कोटी रुपये देण्यात आले. सिंचन योजनेसाठी 93 हजार कोटी रुपये , पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत १.७५ लाख कोटी रुपयांची मदत , कांदा, बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटवणे आदी निर्णय घेतले असे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी नमूद केले.


मोदी सरकारने अनुसूचित जाती ( SC ) , अनुसूचित जमाती ( ST ) आणि अन्य मागासवर्गीयांना ( OBC) ना कायमच सन्मान दिला .राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा दिला. मोदी सरकारच्या किसान योजनेचे 80 टक्के लाभार्थी , प्रधानमंत्री आवास चे 45 टक्के लाभार्थी अनुसूचित जाती ( SC ) आणि अनुसूचित जमातीचे ( ST ) चे आहेत तसेच विविध शिष्यवृत्तींमध्ये 58 टक्के तर मुद्रा योजनेत 51 टक्के लाभार्थी एससी , एसटी आणि ओबीसी वर्गातील आहेत.
मोदी सरकारच्या निर्णयांमुळे गेल्या ११ वर्षांत जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून लवकरच चौथ्या स्थानावर पोहोचणार आहे. ‘गतिशक्ती’, ‘भारतमाला’, ‘सागरमाला’, ‘इंडस्ट्रियल कॉरिडोर’ यांसारख्या योजनांमुळे देशाच्या कानाकोप-यात कनेटिव्हिटी पोहोचल्याने गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. ‘वंदे भारत’ स्वदेशी गाड्या क्रांती घडवत असून, गावागावांत इंटरनेट पोहोचते आहे.

कलम ३७० हटवणे, तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणे, नवीन वक्फ सुधारणा कायदा तयार करणे , नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) अशी अनेक ऐतिहासिक पावले मोदी सरकारने उचलली असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस व आमदार श्री. रणधीर सावरकर यांनी सांगितले . अकोला जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली रेल्वे, घरकुल तसेच प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. ई बस सेवा, आरोग्य सेवा, तसेच वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारने आणून विकास भारत, विकसित गाव करण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेन्द्रे मोदी यांच्या सरकारने कामे केली आहे. या वेळी खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जयंत मसने, किशोर पाटील, माधव मानकर, गिरीश जोशी, संजय गोटफोडे, देवाशिष काकड, आम्रपाली उपर्वट, राधिका तिवारी, वैशाली निकम, चंदा शर्मा, सुमनताई गावंडे, डॉ. अमित कावरे, अंबादास उमाळे, राजेश बेले, शंकर राव वाकोडे, रवी गावंडे, मनिराम ताले, अमोल साबळे, विपुल घोगरे, किशोर कुचके, संतोष पांडे, कृष्ण शर्मा, संदीप गावंडे, रमण जैन, डॉ. अभय जैन अद्व्हो. ठाकूर, सिद्धार्थ शर्मा, डॉ. किशोर मालोकार, सुबोध गवई, पंकज वाडी वाले, जयकुमार ठोकळ, गोपाल मुले, गणेश अंधारे, रणजीत खेडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!