Join Whatsapp

सामुहिक श्राद्ध, पितृ तर्पण, पिंड दान संपन्न

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क –
दरवर्षीप्रमाणे पितृ पक्ष निमित्त अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वारच्या मार्गदर्शनात स्वर्ग, कीर्ती, पुष्टी ,बल, लक्ष्मी ,पशु, सौख्य ,धनधान्य प्राप्तीसाठी तसेच पितर शांती करिता तर्पण संस्कार, सामूहिक श्राद्ध,पिंड दान व गायत्री पंचकुंडी यज्ञ चे आयोजन रविवार 29 सप्टेंबर 2024 रोजी अग्रसेन भवन मूर्तिजापूर येथे आयोजन करण्यात आले होते. देव ऋषी पितर व मनुष्य यांना जलांजली देऊन तृप्त करणे म्हणजेच तर्पण. ज्यांच्या नावाचा उल्लेख करून तर्पण केले जाते त्यांनी आपले कल्याण करावे हा तर्पण करण्याऱ्याचा हेतू असतो. तर्पण केल्याने पीतर नुसते संतुष्ट होऊन निघून जात नाही तर तर्पण करणाऱ्याला आयुष्य तेज ब्रह्म वर्चस्व संपत्ती यश व अन्नधान्य देऊन तृप्त करतात.असे प्रतिपादन आपल्या संबोधनात डॉ.मधू अग्रवाल यांनी केले. डॉ.सुरेश राठी यांनी व्यसन मुक्ती वर विविध उदाहरण व गीता द्वारे मार्गदर्शन केले तर गावंडे ताई यांनी सर्व तर्पण विधी सम्पंन केला.
कंझरा येथे 84तर
मूर्तिजापूर येथे जवळपास १०० परिवार द्वारे तर्पण करण्यात आले.
कंझरा येथील कन्या मंडळ चे पुष्वृष्टी करून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
गायत्री परिवार मुर्तिजापूर,
गायत्री कन्या मंडळ कंझरा यांनी सहकार्य केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!