Join Whatsapp

खेळाडूंच्या न्याय हक्कासाठी सागर मगरे यांचे आमरण उपोषण

Photo of author

By Sir

Share

छत्रपती संभाजी नगर- क्रीडा क्षेत्रातील विविध समस्यांवर शासनाला विविध प्रकाराच्या मागण्या सागर मगरे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांनी केल्या होत्या. जेणेकरून खेळाडूंचे भवीतव्य अंधारात राहणार नाही पण शासनाकडून अद्यापही या पाठ पुरवठ्याला व मागण्यांना काही उत्तर आले नाही या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 रोजीविभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजी नगर सकाळी दहा वाजता आमरण उपोषणाचा एल्गार पुकारण्यात आला आहे 1) शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार खेळाडूंना सांगली महानगर पालिके प्रमाणे सर्व शासकीय निम शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात यावी .2) दिनांक 24 मे 2024 रोजी जाहीर केलेल्या ५% क्रीडा आरक्षणाचे प्रारूप मध्ये 3 राज्यस्तरीय स्पर्धा व त्यात 1 अथवा 2 पदक असावे या प्रमाणे क्रीडा आरक्षण असावे तसेच कनिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या खेळाडूंचा समावेश करून क्रीडा आरक्षण लागू करावे लागू होईपर्यंत कुठली भरती घेऊ नये.3) शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना व्यवसायामध्ये सवलत देण्यात यावी जसे पेट्रोल पंप, गॅस एजन्सी,रेशन दुकान, व तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जामध्ये सवलत4) शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात यावी .5) शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासनाच्या वतीने मानधनावर प्रशिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावे6)11 सप्टेंबर 2024 रोजी जाहिर झालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडू नियुक्ती अ, ब व क गटातील थेट नियुक्त कोणत्या आधारावर देण्यात आलेली चौकशी करण्यात यावी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही मान्यता प्राप्त होती का? त्यात 12 पेक्षा अधिक देश त्या सहभागी होते का ? त्यातील क्रीडाप्रकार व उप प्रकार हे 5% क्रीडा आरक्षण आहेत का? या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी7 तालुका क्रीडा अधिकारी पदा साठी झालेल्या भरती मधील झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे व ज्या परीक्षार्थी चे नाव वगळण्यात आले त्यांना मुलाखतीसाठी संधी देण्यात यावी8 ) गरजू शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना म्हडा , सिडको चे घर देण्यात यावे. 9) क्रीडा शिक्षक भरती सुरु करावी10) प्रोत्साहन म्हणून 17 वर्ष्याआतील राष्ट्रीय खेळाडूंना छत्रपती संभाजी महाराज क्रीडा पुरस्कार सुरु करण्यात यावेखेळाडूच्या उज्वल भविष्यासाठी खेळाडूंनी व पाल्यांनी तसेच शहरातील नागरिकांनी उपोषणाला हजर राहावे असे आव्हान सागर मगरे यांनी केले आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!