अकोला : आगर ग्रामपंचायतमधील २०२१ ते २०२४ या वर्षातील कथित घोटाळा चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत. याबाबत गटविकास अधिकारी यांनी सरपंचासह सचिवांवर १० डिसेंबररोजी नोटीस बजावून २४ तासाच्या आत घोटाळ्याबाबतच्या तक्रारीवर स्वयंस्पष्ट खुलासा मागितला आहे.
तसेच तक्रारीत नमूद केलेल्या एकूण ९ बाबींची सविस्तर माहिती देण्याचेही आदेशित केले आहे. दरम्यान, अँटी करप्शन कमिटीचे एम.के दिवनाले यांनी ग्रामपंचायतमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करुन याबाबत माहिती मागितली होती.
दिवनाले यांनी आगर ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनिमितता झाल्याबाबत जि.प.च्या सीईओ यांच्याकडे तक्रार केली होती.
आर्थिक व्यवहार झाल्याच्या कामाची तपशीलवार माहिती मागितली होती. परंतु, दिवनाले यांना सुमारे अडीच ते तीन महिन्यापासून माहिती दिली नाही. याबाबत त्यांनी वारंवार वरिष्ठांकडे पा’पुरावा केला. वरिष्ठांनीदेखील ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देण्याचे सूचित केले. परंतु, अद्यापपर्यंतही सचिवांनी माहिती दिली नसल्याचे दिवनाले यांनी गटविकास अधिकारी यांना अवगत केले.
दरम्यान, गटविकास अधिकारी यांनी सरपंच व सचिव यांना १० डिसेंबररोजी एका पत्रान्वये माहितीसह खुलासा करण्याचे आदेशित दिले होते परंतु अद्याप हि ग्रामपंचायत या बाबत माहिती देण्यात आली नाही.
कोणत्या मुद्द्याची मागितली माहिती
२०२१ ते २०२४ या कालाधीत शासनाकडून तसेच इतर यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या निधीची तपशिलवार माहिती.
या कालावधीत करण्यात आलेल्या खर्चाची योजना निहाय माहिती.
नोंदी असलेल्या आपल्या कार्यालयातील तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता नोदवहीतील पाने.
या कालावधीत नोंदी असलेली रोकड पुस्तके
नोंदी असलेल्या आपल्या कार्यालयातील तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता नोदवहीतील पाने.
या कालावधीत नोंदी असलेली रोकड पुस्तिकेची (कॅश बुक) ची पाने.
ग्रामपंचायतने केलेल्या वसूलीची तपशिलवार माहिती.
ग्राम सचिव, ग्रामविकास अधिकारी यांची मंजूर दौरा दैनंदिनी (टूर डायरी)
कार्यालयातील नमूना ९ ची नोंदवही.
लेखा परिक्षण अहवाल.
लेखा परिक्षणाचा अनुपालन अहवाल.
आगर ग्रामपंचायती मध्ये आर्थिक अनियमिततेचा खरंच काही गोंधळ आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहे.
