Join WhatsApp group

लॉजवर नको तो कुंटणखाणा – तुळजापुरचे पुजारीही सापडले, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्यूज डेस्क २३ – लातूर शहरातील शिवाजी रोड स्क्रॅप मार्केट जवळील आनंद लॉज मध्ये वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर पोलिसांच्या ए एच टी यु पथकाला याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक लॉजवर पाठवून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

लातूर शहरातील शिवाजी रोड स्क्रॅप मार्केट जवळील आनंद लॉज मध्ये वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर पोलिसांच्या ए एच टी यु पथकाला याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक लॉजवर पाठविला. ग्राहकाने इशारा देताच पथकाने आनंद लॉजवर धाड टाकली. त्यावेळी दोन पीडित महिलांना आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. तर त्यांनी निरीक्षणात ठेवले आहे. या महिला परराज्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी लॉज व्यवस्थापक व इतर साथीदार अशा सात जणांना लॉजवरून ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये तुळजापूर येथील चार लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये तुळजाभवानी मंदिराचे पुजारी व क्रिकेटपटू यांचाही समावेश असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पीडितांना बोलावून त्यांना वेश्याव्यवसाय करुन घेतल्याची माहिती मिळताच त्याची खात्री करुन पोलिसांनी छापा मारला. वेश्या-व्यवसाय चालवणाऱ्या दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपी हे तुळजापूरचे आहेत. तर उर्वरित सहा आरोपी लातूर येथील आहेत तर तीन आरोपी फरार झाले आहेत.

यापूर्वीही लॉजवर वेश्याव्यवसाय चालवला जायचा
दोन वर्षांपूर्वी लातूर शहरातील आनंद लॉजवर पोलिसांकडून धाड टाकण्यात आली होती यामध्ये त्यावेळी चार महिलांची सुटका पोलिसांकडून करण्यात आली होती. अनेक अनैतिक विषयांमुळे हा लॉज कायमचा चर्चेत राहिला आहे.

पोलिसांकडून लॉज सील
या लॉजवर मागील बऱ्याच दिवसांपासून वापरला जात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या लॉजला टाळे ठोकले आहेत. यामध्ये तीन फरार असलेले आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. परराज्यातील दोन महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली एकूण दहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी चार आरोपी हे तुळजापूर येथील आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!