Join WhatsApp group

नीलकंठ सुतगिरणीजवळ २७ किलो गांजासह दोन तस्कर अटकेत – ५.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला | प्रतिनिधी | दिनांक २४ जुलै

अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा गांजा तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर नीलकंठ सुतगिरणीजवळ सापळा रचून दोन गांजा तस्करांना अटक करण्यात आली.

या कारवाईत तब्बल २६ किलो २७६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजित किंमत ५ लाख २५ हजार ४८० रुपये इतकी आहे.गुप्त माहितीच्या आधारे मूर्तिजापूर रोडवरील सुतगिरणी परिसरात पोलिसांनी छापा टाकला.

मोहम्मद झाकीर अब्दुल अब्दुल कादिर आणि समीर खान मेहबूब खान या दोघांना अटक करण्यात आली. यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीचा विळखा वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अशा टोळ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.या ऑपरेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप पळसपगार, अनिल खेडकर, विनय जाधव, रवींद्र घिवे, संदीप गुंजाळ, नदीम शेख व प्रफुल्ल बांगर यांनी सहभाग घेतला.

ही कारवाई अकोला पोलिस दलाच्या सशक्त गुप्तचर यंत्रणेचा आणि तात्काळ प्रतिसाद क्षमतेचा प्रत्यय देणारी ठरली असून, जिल्ह्यात ड्रग्जविरोधी मोहिमेला वेग मिळाला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!