Join WhatsApp group

हातगाव ग्रामपंचायतसमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस – महिलांचा संताप, प्रशासनाकडून अद्याप कोणतीच कारवाई नाही

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर (दि.१७) :हातगाव ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विविध प्रश्नांवर गेल्या तीन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर मा. सुरेशभाऊ जोगळे (माजी सैनिक) तसेच श्री. शिवदास मधुकर राऊत, देवेंद्र बोळे, अतुल शिंदे, संजय जोगळे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांच्या सहभागाने धरणे आंदोलन सुरू आहे.

आज आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, त्यामुळे गुणवंत नगर परिसरातील महिलांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

अनेक महिला आणि ग्रामस्थ आज आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.

काल दुपारी विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

या नेत्यांमध्ये प्रमुखता :

शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख मा. दीपक पाटील दांडले, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मा. राजूभाऊ जोगदंड, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मा. गुलाबराव म्हासये पाटील,वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते रोहित अंभोरे, यांचा समावेश होता.

नेत्यांनी आंदोलनाच्या मागण्या योग्य असल्याचे स्पष्ट करत, प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी केली. मा. दीपक पाटील दांडले यांनी तहसीलदार मॅडम यांच्याशी थेट चर्चा करत संबंधित अधिकार्‍यांना योग्य कार्यवाही करण्यास सांगितले.

आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता असून, ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्ते आणि ग्रामस्थांनी केली आहे.

गावकऱ्यांचे लक्ष आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे खिळलेले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!