Join WhatsApp group

चोर झाले लाल, चंद्रपूर जिल्हा महसूल विभागाची जाड झाली खाल.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक 22 : नरेश वासनिक : चंद्रपूर : जिल्ह्यात रेती तस्करीच्या बाबतीत चोर झाले लाल महसूल विभागाची जाड झाली खाल. अशी चर्चा सध्या चंद्रपूर जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील रेती घाटाच्या लिलाव झाला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रेती तस्कर रेतीची चोरी करत असल्याची बोंब दुर्गापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

रेती तस्कर चोरीचा रेतीचा सौदा महागड्या भावात आहे. रेती तस्कर तसेच महसूल विभागाच्या संगतमताने अवैध रेती उत्खनन व वाहतूक जोमाने सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दुर्गापूर परिसरातून सकाळी चार वाजता च्या दरम्यान हे रेती चोर आपले हाफ टन किंवा ट्रॅक्टर ने रेतीची चोरी करून वाहतूक केली जात आहे.

त्यात चंद्रपूर जिल्ह्याचे महसूल अधिकारी तसेच दुर्गापुर ,पोलिस अधिकाऱ्यांची हातमिळवणी झाल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे.

जोपर्यंत अधिकाऱ्यांच्या साथ भेटत नाही तोपर्यंत रेती चोरी करण्याची कोणीही हिम्मत करू शकत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात काही अधिकारी सक्षम असल्यामुळे रेतीचे ट्रॅक्टर हायवा ट्रक जेसीबी, पकडण्याची बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर नेहमी येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात घरकुल लाभार्थी रेती घाटाच्या लिलावाची प्रतीक्षा करत आहे ,कारण रेती घाटाचा लिलाव झाला तर स्वस्त दरात रेती मिळणार घरकुल बांधण्यात सोपे होणार.

परंतु शासन व प्रशासनाला रेती घाटाच्या लिलाव विसर पडला की काय ? असा प्रश्न सामान्य जनतेला तसेच कंत्राटदाराला पडलेला आहे.

रेती अभावामुळे विकासही खोळंबला आहे .जल जीवन ,मिशनचे कामे अपूर्ण राहिलेली आहे व इतरही कामांना सध्या पूर्णविराम आहे.

घाटाच्या लिलाव झाला तर अपूर्ण कामे पूर्ण होणार विकासाचे व इतरही, शासन व प्रशासनाने लक्ष देऊन रेती घाटाचे लिलाव करावे. अशी मागणी सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील जनता करत आहे

रेती चोरीमुळे लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे. ते पण बुडणार नाही, महसुलीचे लाखो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होणार आणि शासनाच्या तिजोरी भर पडणार.

रेती घाटाचे लिलाव झाले तर नागरिकांना रेती स्वस्त दरात मिळणार आणि अपूर्ण कामे पूर्ण होणार.

रेती चोर व तस्करान वर व काही महसूल विभागाचे अधिकारी यांच्यावर आळा घालणार का?

रेती चोरीमुळे आपले खिसे गरम करत राहणार असा सवाल सध्या चंद्रपूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!