Join WhatsApp group

शहराच्या हृदयात असलेली ‘बियाणी जीन’ची जागा ठरू शकते मुर्तिजापूरच्या विकासाची संजीवनी!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर | प्रेमराज शर्मा| २५ जुलै २५

आपल्या इतिहासा मध्ये औद्योगिक विकासासाठी सरकारने काही ठिकाणी खासगी व्यक्तींना जमिनी भाडे तत्वावर दिल्या होत्या. अशाच प्रकारे, मुर्तिजापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील एक महत्वाची जागा – बियाणी जीनची जमीन – ९९ वर्षांच्या करारावर बियाणी कुटुंबाला दिली गेली होती अशी चर्चा जनते मध्ये आहे.

त्यांनी या ठिकाणी जिनिंग व प्रेसिंग, ऑइल मिल फॅक्टरी सुरू करून शेतकऱ्यांना आधार दिला आणि शहरात रोजगाराची संधी निर्माण केली होती.मागील 30 ते 40 वर्षांनी देखील जमीन सामाजिक वापरात नाही.

आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षांचा काळ उलटून गेला असला, तरी देखील ही जमीन अजूनही बियाणी कुटुंबाच्या ताब्यातच असून सध्या या जागेचा कोणताही उपयुक्त सामाजिक उपयोग केला जात नाही.

ही जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून सार्वजनिक विकासासाठी अत्यंत मोलाची आहे. ही जमीन स्वतःच्या व्यापारी स्वार्थासाठी वापरण्यात येत आहे असे चित्र उघडपणे मुर्तीजापुर चे नागरिक दररोज बघत आहे.

जमीन शासनाचे व फायदा एका कुटुंबाचा का? असा सवाल नागरिक करत आहे.

विकासाला अडथळा ठरणारे साठे-लोटे आणि भ्रष्ट अधिकारी?

या जमिनीचा ताबा पुन्हा नगरपरिषदेच्या हातात येऊ नये म्हणून नगरपरिषदेतील काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय साठे-लोटे बियाणी कुटुंबाशी हातमिळवणी करून ही जमीन न्यायप्रविष्ट असल्याचे भासवून वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

या कथित संगनमतात नगरपरिषदेतील काही भ्रष्ट लोकप्रतिनिधी, नगरसेवक, तसेच अधिकाऱ्यांचे नाव समोर येत असून त्यांनी कोर्टात मुद्दाम खटले दाखल करून या जमिनीच्या हस्तांतराला अडथळे निर्माण केले आहेत, असा आरोपही नागरिकांनी केला आहे.

शहरासाठी विकासाची सुवर्णसंधी जर ही जमीन नगरपरिषदेच्या ताब्यात आली, तर येथे शासकीय कार्यालये, समाज भवन, व्यापारी संकुल, क्रीडा संकुल, हॉकर्स झोन यांसारखे प्रकल्प उभारता येऊ शकतात. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो आणि स्थानिक व्यापाराला चालना मिळू शकते.

सामाजिक संघटनांचा इशारा – लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन मुर्तिजापूर तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “ही जागा मुर्तिजापूरकरांच्या हक्काची आहे, आणि विकासाच्या विरोधात साठे-लोट्यांचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही” असा इशारा दिला आहे.

त्यांनी लवकर निर्णय न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची तयारी दर्शवली आहे.

आंदोलनातून मार्ग न निघाल्यास सामाजिक संघटना जनहितार्थ याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्याची तयारी सुद्धा दाखवीत आहे.

आता आमदारांची भूमिका ठरणार निर्णायक!

सध्या मुर्तीजापुर तालुक्याची अपेक्षा आमदार हरीश पिंपळे यांच्यावर येऊन ठेपली आहे कारण तालुकाच्या विकासासाठी हरीश पिंपळे सदैव तत्पर असतात व असे कठोर निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये कुवत आहे.

मागे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी वस्ती पर्यंतचा मुख्य रस्ता बांधताना त्यांच्यावर बियाणी सोबत होणारे साठे लोटे हे जगजाहीर आहे.

सामाजिक संघटना पुढे आल्यावर या वादग्रस्त मुद्द्यावर मुर्तिजापूरचे आमदार मा. हरिष पिंपळे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

त्यांनी जर या विषयावर स्पष्ट व ठोस भूमिका घेतली, तर हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होऊ शकते.मुर्तीजापुर शहरा करिता या जागेचा मुद्दा हरीश पिंपळे साठी अग्निपरीक्षा ठरेल. अशी चर्चा सध्या मुर्तीजापुर शहरात रंगली आहे.

🗣️ – सरकारमाझा न्यूज(तुमच्या हक्कासाठी आवाज बुलंद करणारे)


Share

Leave a Comment

error: Content is protected !!